सुस्वागतम्!
हि वेबसाईट बनविण्याचे काम सुरू आहे. तरी या वेबसाईटला पुन्हा भेट नक्की द्या. तसेच अशा विषयावर मराठी भाषेतून वेबसाईट सहसा बनविली जात नाही. खरं सांगु, मराठी भाषेतुन वेबसाईट बनवितांना असंख्य आव्हाने येतात. ती आव्हाने झेलून व पदरमोड करून आम्ही हि वेबसाईट तुमच्यासाठी बनविली आहे. तुम्हाला विनंती आहे की या वेबसाईटबद्दल तुमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल अकाउंट्सवर चार शब्द लिहा. थोडक्यात हि वेबसाईट मित्र-मैत्रिणींमधे शेअर करा.
प्रास्ताविक
या वेबसाईटवर तांदुळवाडी किल्ल्याबद्दल संपुर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या वेबसाईटचा मेनु पहा, तुम्हाला याची कल्पना येईल. तांदुळवाडी किल्ल्यावर दरवर्षी साधारणत: 3,000-10,000 ट्रेकर्स येतात. तुम्हालाही यायचे आहे का? असेल तर ट्रेक बुकींग बटनावर क्लिक् करा.
ट्रेकींगच्या दृष्टीकोनातून तांदुळवाडी किल्ला लेव्हल 3 चा मानला जातो. म्हणजे तुमच्या जीवीतास हानी पोहचू शकते. या जंगलात हिस्त्र श्वापदे, विषारी साप, विंचू इ. चा वावर आहे. तसेच चढाईसाठी पायऱ्यांचा वापर न करता इतर मार्गांचा वापर तुम्ही करणार असाल तर ते सर्व मार्ग काही ठिकाणी अती धोकादायक आहेत. तरी देखील खुप ट्रेकर्स किंवा सहली या किल्ल्यावर येतात. जी मज्जा तांदुळवाडी किल्ला सर करताना येते ती इतरत्र सहसा येत नाही. तुम्ही हा किल्ला सर केलात (पायऱ्यांचा रस्ता सोडून इतर मार्गांनी) की तुम्ही महाराष्ट्रातील साधारणत: कोणताही किल्ला सर करू शकाल. हा आत्मविश्वास तुम्हाला तांदुळवाडी किल्ला सर केल्यानंतर निश्चितच येईल.
वेबसाईट बनविण्याचा उद्देश
- हजारो ट्रेकर्स दरवर्षी या किल्ल्यावर ट्रेकींगच्या निमित्ताने येतात. त्यातील कित्येकांना या किल्ल्याचे तत्कालिन ऐतिहासिक व भौगोलिक महत्व ठाऊक नसते. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही संबंधीत माहिती घेऊ शकता.
- या किल्ल्यावर दरवर्षी नवखे ट्रेकर्स किंवा सहलीस येणारे येतात. नवखे असल्याने जंगलात हरविण्याचे प्रकार दरवर्षी व्हायला लागले आहेत. कोणत्या हंगामात कोणती काळजी घ्यावी, हंगामानुसार किती वाजेपर्यंत किल्ल्यावर रहावे, येण्याजाण्याचे मार्ग इत्यादी माहिती या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल.
- किल्ला साधारणत: एक हजार वर्षे जुना आहे. तसेच या किल्ल्यावर अनेक हल्ले झाले. स्वातंत्र्यानंतर या किल्ल्यावर येणाऱ्यांनी या किल्ल्यावरील वास्तु व वस्तुंची वाट लावली. त्यामुळे इथे भेट दिल्यावर अप्रतिम निसर्गसौदर्य व ट्रेकींची अनुभूती याशिवाय ट्रेकर्संना दुसरे काहीच कळत नाही. किल्ल्यावर अजुनही काही बाबी सहीसलामत आहेत. त्यांची माहिती तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून होईल.
- तांदुळवाडी किल्लावरील व मार्गात अनेक धोके आहेत. यांची माहिती नवीन फिरस्त्यास (ट्रेकर) नसते. आम्ही सन 1983 पासुन या किल्ल्यावर अगणित वेळा गेलो आहोत. त्यामुळे संबंधीत धोक्यांची इंत्यभूत माहिती आम्हाला असते. तसेच काळानुरूप धोके कमी वा जास्त होतात, धोक्यांची ठिकाणे वा काळ बदलतो. हि माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून शेअर करू.
- ट्रेकदरम्यान कोणती काळजी घ्यावी
- या किल्ल्यासंबंधीत रंजक गोष्टी तुम्हाला कळाव्यात
स्थानिकांमधे या किल्ल्याबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत. काही गंमतीशीर तर काही भीतीदायक आहेत. या गोष्टी तुम्हाला या वेबसाईटवर वाचता येतील. - योगदान कळावे
किल्ल्यावर येणाऱ्या ट्रेकर्संना स्थानिक वेगवेगळ्या प्रकारे मदत करीत असतात. तसेच सफाळे पोलिस स्टेशन, सफाळे वनखाते व स्थानिक ग्रामपंचायत व ग्रुप्स हे ट्रेकर्संना वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गाने मदत करीत असतात. त्याची माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला होईल - आजुबाजुच्या सेवा व सुविधा कळाव्यात
जेवण व नाश्त्याची सोय कुठे आहे, ATMs कुठे आहेत, किल्ल्यावर कोणती मोबाईल नेटवर्क्स आहेत, किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत ये-जा करण्यासाठी वाहतुक व्यवस्था, हॉस्पिटल्स ची माहिती तुम्हाला मिळावी. - आजुबाजुचे ट्रेक्स कळावेत.
या किल्ल्याच्या आजुबाजुला अनेक धबधबे व ट्रेकींगसाठी ठिकाणे आहेत. त्याची माहिती तुम्हाला व्हावी.
- तुमच्यासारख्यांचे अनुभव कळावेत