तांदुळवाडी किल्ल्या जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. या किल्ल्याच्या आजुबाजुच्या गावातून जाण्यासाठी रस्ते आहेत. आजुबाजूची गावे खालीलप्रमाणे –
- तांदुळवाडी
- लालठाणे
- सफाळे
- कपासे / माकुणसार
तांदुळवाडी गावातून कसे जायचे?
तांदुळवाडी गावात जि. प. शाळा आहे. तसेच हा बस स्टॉप देखील आहे. जि. प. शाळेच्या बाजुला ग्रामपंचायतीने पेव्हर ब्लॉक्स टाकून वाहनतळ बनविला आहे. येथे तुम्ही तुमची वाहने पार्क करू शकता. या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला / दुकानदाराला किल्ल्यावर जाण्याचा मार्ग विचारला तरी ते तुम्हाला सांगतील.